

सौ. कानन माधव काकरे
( ज्योतिष तज्ज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)
Virgo Horoscope : कन्या राशी राष्ट्रीय सहावी रास आहे हिंदी स्वभावी स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची आहे बुध हा ग्रह या राशीवर स्वामित्व करतो. हातात फुलांची फांदी घेतलेली कन्या हे या राशीचे प्रतीक आहे.
बुद्ध हा ग्रह या राशीचे स्वामित्व करत असल्याने बुद्धिमत्तेकडे आकर्षित असलेली अशी ही रास ज्ञानाची जिज्ञासा तीव्र स्मरणशक्ती चाणक्य बुद्धी तर्कशुद्ध विचारसरणी आणि उत्तम बुद्धिमत्ता हे या राशीकडे असते. नवीन नवीन संशोधन करणे चांगली कल्पनाशक्ती त्यामुळे विज्ञानात संशोधनात कन्या व्यक्ती आपल्याला आढळून येतात.
कन्या राशीची व्यक्ती एखाद्या गोष्टीवर बऱ्याचशा जणांचा सल्ला घेत असते मात्र आपल्या मनाचा ठानपत्ता कोणासही लागून देत नाही थोडीशी आतल्या गाठीशी अशी ही रास आहे. या राशीची व्यक्ती अनेक भाषांमध्ये पारंगत असते. यांच्याकडे हजरजबाबीपणा वाकचातुर्य आणि दूरदर्शीपणा हे निसर्गतः गुण असतात. पराक्रम आणि धाडस या गोष्टींचा यांच्याकडे अभाव असतो त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे नेतृत्व पुढारी कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे मागे राहून काम करणे यांना अधिक पसंत असते.
एखाद्या गोष्टीचा चौफेर विचार करून अभ्यास करून हे निर्णय देत असतात. एकांत वास यांना आवडतो खोलात जाऊन विचार करणे ही यांची खासियत असते. या राशीकडे धूर्तपणा कावेबाजपणा जास्त असतो एखादी गोष्ट गुपित ठेवण्याची वृत्ती त्यांच्याकडे असते मनमोकळेपणाचा अभाव आमच्याकडे असतो स्वतःच्या फायद्याकडे अधिकाधिक लक्ष देतात इतरांना मार्गदर्शन करणे यांना आवडते गोष्टीचा संग्रह करणे यांना आवडते. कन्या राशि कडे बुद्धी प्रगल्भता असल्यामुळे अंग मेहनतीची कामं यांना आवडत नाहीत. त्यामुळे शारीरिक कष्टांचा अभाव यांच्याकडे असतो.
कन्या राशीचे व्यक्ती हे ऑडिटर परीक्षा अकाउंटंट पुस्तक विक्रेते खाली ग्रंथकार किराणाचे दुकान मार्केटिंग क्षेत्र यामध्ये आढळतात
कन्या राशीचे स्त्री पुरुष हे एखाद्या चांगले जोडीदार होऊ शकतो आपल्या जोडीदाराबाबत हे एकनिष्ठ असतात संसार सुखाकडे यांचा कल असतो. कन्या राशि ने जोडीदार निवडताना किंवा व्यवसायिक भागीदार निवडताना पुढील राशींचा विचार करावा. वृश्चिक, धनु,मकर, मीन, वृषभ आणि कर्क या राशींचे जोडीदार किंवा भागीदार निवडले तर त्यांचा पुढील जीवनक्रम हा व्यवस्थित असतो.
कन्या राशि बिघडल्यास होणारे दुष्परिणाम म्हणजे मुळातच ही स्वाभावी रास असल्याने कुठल्याही गोष्टीवर निर्णय लवकर न घेणे किंवा न देणे यामुळे फार मोठे नुकसान होते.
कन्या राशि मध्ये आढळणारे आजार म्हणजे पोट दुखणे गॅसेस संग्रहणी टायफाईड ऍसिडिटी आणि त्वचा विकार.
या राशीचा मंत्र :
प्रियंगुकलिकाशामं रुपेणाप्रतिमं बुधम् |
सौम्यं सौम्यगुंणोपेतं तं बुधम् प्रणम्याहम ||
हा मंत्र रोज चौदा वेळा म्हणावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.