

Weak Rahu Signs:
Sakal
Astrology Rahu: ज्योतिषशास्त्रात एकूण नऊ ग्रहांचा उल्लेख असून यामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू यांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे स्वरूप, प्रभाव आणि महत्त्व असते. असाच एक ग्रह राहू असून जो सामान्यतः अशुभ ग्रह मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, राहू हा एक राक्षस आहे आणि त्याला उत्तर चंद्रबिंदू किंवा चढत्या चंद्रबिंदूचा स्वामी मानलं जातं. राहूला सर्परूप देखील म्हटलं जातं आणि तो राक्षसी प्रवृत्तींचे प्रतीक आहे.