Wedding Traditions : पाठवणीच्या वेळी नवरीचेया हातून तांदूळ का उधळतात? ही आहेत ५ कराणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding Traditions

Wedding Traditions : पाठवणीच्या वेळी नवरीचेया हातून तांदूळ का उधळतात? ही आहेत ५ कराणं

Wedding Traditions : भारतात जेवढे प्रांत तेवढ्या पध्दती आहेत. त्यात प्रत्येक प्रांताची आपली अशी वेगळी खासियत, रुढी परंपरा आहेत. लग्नांच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. पण एक पध्दत मात्र बहुतांश ठिकाणी बघायला मिळते, ती म्हणजे पाठवणीच्या वेळी तांदूळ उधळणे. काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या.

लग्न हे शुभकार्य असतं. त्याच्या प्रत्येक विधीत, पध्दतीत आनंदाचं वातावरण असतं. गणेश पुजनापासून याची सुरूवात होते. साखरपुडा, मेंदी, हळद, लग्नाचे विधी, रिसेप्शन अशा सगळ्याच गोष्टी फार आनंदी वातावरणात पार पडतात. पण शेवटी मुलीची पाठवणी करण्याचा क्षण सगळ्यांसाठीच फार भावूक क्षण असतो.

हेही वाचा: Wedding Muhurat 2023 : लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! तब्बल आठ महिने असणार मुहूर्त!

काय असते पध्दत

मुलीची पाठवणी करताना तिला निरोप देताना पुढे चालत, मागे न बघता नवरीच्या हातून मागे तांदूळ उळले जातात. ते तिच्या माहेरच्यांनी विशेषतः आईने झेलावे असे मानले जाते.

हेही वाचा: Wedding Shopping Markets : स्वस्त अन् मस्त; यंदाच्या लग्नसराईत लग्नाचा बस्ता तर याच मार्केटला बांधायचा!

का केलं जातं

  • तांदळाला लक्ष्मीचं प्रतिक समजलं जातं. समृध्दीचं प्रतीक मानलं जातं.

  • नवरी जाताना ते उधळते कारण या मागे असा विश्वास असतो की, जरी तिचं लग्न झालं तरी माहेच्या सुखसमृध्दीसाठी ती प्रार्थना करते.

  • मुलीली लक्ष्मीचं रुप मानलं जातं. तिची पाठवणी केली म्हणजे तिच्यासोबत माहेरची लक्ष्मी जाऊ नये. म्हणून त्याचं प्रतिकात्मक रुप तांदूळ ती उधळत जाते. एका अर्थी माहेरची लक्ष्मी तिथेच नांदू दे अशी शुभेच्छा देते.

  • शिवाय लहानाची मोठी ज्या घरात झाली, तिथे कशाचीच कमतरता भासू नये या शुभेच्छांसह धन्यवाद करण्याचं हे माध्यम समजलं जातं.

  • तांदूळ समृध्दीचं प्रतीक आहे. आणि जेवणाचाही अभिन्न अंग आहे. त्यामुळे माहेरी अन्नाची कमतरता भासू नये अशी मनोकामनो करत मुलगी सारसरच्या वाटेने निघते.

टॅग्स :weddingwedding ceremony