November Horoscope: 'या' तीन राशींसाठी नोव्हेंबर महिना ठरणार लकी; संपत्तीत होणार प्रचंड वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

November Horoscope

November Horoscope: 'या' तीन राशींसाठी नोव्हेंबर महिना ठरणार लकी; संपत्तीत होणार प्रचंड वाढ

November Lucky Days: नोव्हेंबर महिन्यला सुरूवात असून या महिन्यात गुलाबी थंडीला सुरूवात होते. गुलाबी थंडीसह या महिन्यात काही राशींचे नशीबदेखील चमकणार आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत बुध तूळ राशीत राहाणार असून खालील तीन राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. जाणून घ्या या तीन राशीत तुमचीही रास आहे काय ते.

कन्या

या राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. इतकंच नाही तर या राशीच्या व्यक्तींना कामाच्या क्षेत्रात अनुकूल संधी मिळू शकते. परिणामी तुमच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होईल. विद्यार्थीदशेत असाल तर शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका होऊ शकते. (Horoscope)

कर्क

ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाने तुमच्या कुंडलीच्या चौथ्या भावात प्रवेश केलाय. यामुळे करिअर आणि व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. तसेच या राशीच्या व्यक्तींना पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. इतकंच नाही तर पैशांशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. याशिवाय समाजात तुमची लोकप्रियताही वाढू शकते. (Rashi Bhavishya)

मिथुन

बुधाचा प्रवेश होताच या राशीच्या व्यक्तींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. यावेळी लोकांना व्यवसायात चांगले पैसे मिळू शकणार आहेत. तसंच कर्जामध्ये अडकलेले पैसेही मिळणार आहे आणि दीर्घकाळापासून दिलेले कर्जही वसूल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थीदशेत असणारी मुलंही परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात.

हेही वाचा: Daily Love Rashifal: वैवाहिक अन् प्रेम जोडप्यांसाठी राशीनुसार आजचा दिवस कसा असणार, वाचा

डिस्केमर: संबंधित माहिती ही मान्यतेच्या आधारे असून सकाळ समुह याच जबाबदार नसेल. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.