
Dasara Festival
ESakal
दसरा सणानिमित्त ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हणत एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसर्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा आपट्याची पाने तसेच विविध फुलांनी सजल्या आहेत. परतीच्या पावसामुळे फुलांची आवक घटली असून दरात वाढ झाली आहे. मात्र तरीही दसऱ्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरु आहे.