संत शिरोमणी सावता महाराज कोण होते ?

सावता महाराज एक मराठी संतकवी होते. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते.
savata maharaj
savata maharajgoogle
Updated on

मुंबई : आज संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी. 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी' हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. 'स्वकर्माचे पालक करणे हीच भगवंताची सेवा' असा उपदेश त्यांनी केला.

savata maharaj
Rajarshi Shahu Maharaj :महाराष्ट्रात हरितक्रांतीची पहिली मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी रोवली

सावता महाराज एक मराठी संतकवी होते. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते.

सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली.

savata maharaj
शाहू महाराजांची आठवण आजही का काढली जाते?

संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५चा आहे. ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सावपणा असा याचा अर्थ होतो.

सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.

त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची सांगड घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले.

अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची मुळीच आवश्यकता नाही, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com