Aries Nature : मेष राशीच्या व्यक्तींचं नेमकं कुणासोबत पटतं? वाचा तापट स्वभावाच्या राशीबद्दल सर्वकाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aries

Aries Nature : मेष राशीच्या व्यक्तींचं नेमकं कुणासोबत पटतं? वाचा तापट स्वभावाच्या राशीबद्दल सर्वकाही

सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

Aries Zodic Nature : भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात. त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या-त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो. अशाच बारा राशींचा स्वभाव, वैशिष्ट्य, नातेसंबंध, नोकरी किंवा व्यवसाय, आरोग्य, उपासना यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार पहिली रास येते मेष. मेष ही राशीचक्रातली प्रथम रास आहे. मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे. मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून, ही अग्नी तत्वाची रास आहे.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

हेही वाचा: Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

कशा असतात मेष राशीच्या व्यक्ती?

मेष म्हटलं की पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, निर्धार शक्ती, धडाडी, बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो. मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते. स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे, वागणे आक्रमक वृत्तीचे असते. यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही. यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो. काहीवेळा फटकळ बोलून मोकळे होतात. या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजविण्यात आनंद वाटतो.

न पटवून घेणारी रास

मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात. यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात. काहींशी निर्दयी असतात. अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात सामर्थ्यवान असतात. या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत.यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात तसेच बोलताना मोजकेच बोलतात. या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही. या राशाचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात. ही रास थोडीघमेंडी रास आहे.

हेही वाचा: Swasthyam 2022 : ध्यान, प्राणायाम, योग आणि सुदृढ आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’

कुणासोबत पटते?

मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क, सिंह, तूळ आणि धनु राशीचे असू शकतात. मेष राशीच्या व्यक्तींचे बहुदा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी जुळते.

या विभागांमध्ये मिळवतात विशेष प्राविण्य

या राशीचे लोक सहसा मिल्ट्री, पोलीस खातं, क्राइम ब्रांच, अग्निशामक दल, सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्राविण्य मिळवतात. ही रास तल्लख असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात.

यांची उपासना केल्याने मिळते फळ

या राशींच्या जातकाला अपघात, भाजणे, मेंदू विकृती, ताप, देवी, मलेरिया रक्ताच्या गाठी, डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते.

वरील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.