अधुरी राहिली शहाजीची कहाणी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

“2017 मध्ये सैन्य दलातील सेवापूर्ती होणार असल्याने हुतात्मा शहाजी यांनी नुकतेच कर्ज काढून मनमाड येथे मुलांच्या शिक्षणाच्या दुष्टीने घराचे बांधकाम चालू होते. नुकतेच ते जुलै महिन्यात 50 दिवसांची सुट्टी काढून घरी आले, त्यावेळी घराच्या बांधकामासाठी वेळ देऊन ते प्लास्टर पर्यंत घेऊन गेले एका वर्षानंतर यायचेच असल्याने आई, पत्नी व मुलांसाठी तिथे घर भाड्याने घेऊन खोली केली होती. मात्र नियतीने काही वेगळेच लिहून ठवले होते आणि आज असे घडल्यावर नक्कीच ओठांवर शब्द उमटतात अर्ध्यावरती डाव मोडीला...”  

चिमुकल्या सिद्धी व ओमचे बालवयातच हरपला आधारवड...

“नेमके काय झालय हेच कळत नाही सर्व येता आहेत. गपगप...हळूहळू आवाजात बोलतायत...हुंदके देऊन रडतायत आजी-बाबा, आई, काका-काकू नातेवाईक कोणीही काहीच कस बोलत नाहीय जवळ गेले कि कवटाळता आहेत घरी गर्दी होतेय कशासाठी हे विचारून देखील कोणी सांगत नाही. अश्या गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत, शहीद शहाजीची दोघे मुले सिद्धी (8) व ओम (5) बालपणातच त्यांचा आधारवड हरपला जाईल, त्यांच्या पासून अशी कल्पना देखील केली नसेल त्या चिमुकल्यांनी ” 

शहीद शहाजी गोरडेंची सैन्यदलातील कार्यकाळ...

शहाजी २००२ मध्ये औरंगाबाद येथील भरतीत सैन्यदलात भरती झाला. त्यांनतर त्याची ट्रेनिंग बेळगाव येथे झाली त्यानंतर त्यांनी कुपवाडा, श्रीनगर, अमृतसर,पंजाब येथे देशसेवा बजावली दरम्यानच्या काळात २६ एप्रिल २००७ रोजी रेखाशी शहाजीचा शुभमंगल झाला. त्यानंतर त्यांना सिद्धी व ओम अशी दोन मुले झालीत. थोड्याच दिवसापूर्वी अमृतसर होऊन बांधीपुरा (श्रीनगर) येथे बदली झाली होती.

Web Title: Shahaji remained unfulfilled story ...