भारताने सर्वाधिक गुगल केलेत हे विषय... 

शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे.

या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे.

यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली 2 हा ठरला आहे. तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. केवळ हिंदी भाषेत हा चित्रपट डब (भाषांतर) केला गेला. तरीही अनेक बॉक्स ऑफीस रेकॉर्डस् मोडत चित्रपटाने भारताची सीमा ओलांडली आहे. बाहुबली 2 ने सगळ्यांती उत्सुकता इतकी वाढवली होती की गुगलच्या जागतिक यादीतील पहिल्या 10 मध्ये या चित्रपटाला स्थान देखील मिळाले आहे. 

भारतात सर्वात जास्त गुगल केलेल्या मध्ये द्वितीय स्थान आहे आयपीएलचे. देशातील प्रीमियर क्रिकेट टूर्नामेंट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तिसऱ्या स्थानावर 'लाइव्ह क्रिकेट स्कोअर' च्या यादीतून 'इंडिया नॅशनल क्रिकेट टीम' हा एकमेव भारत-केंद्रित विषय होता ज्याने यावर्षी गुगलच्या जागतिक पहिल्या 10मध्ये स्थान मिळवले आहे. त्यानंतर आमीर खानचा बहुचर्चित चित्रपट दंगलने गुगल सर्चमध्ये चौथ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ पाच अन्य बॉलीवूड चित्रपट आणि आणखी एक क्रिकेट टूर्नामेंट यांनीही चौथ्या क्रमांकाची जागा मिळवली आहे. 

बॉलीवुड अभिनेत्री आणि पूर्वाश्रमीची इंडो-कॅनेडीयन पॉर्न स्टार सनी लिओन ही भारतात गुगल सर्चमध्ये गेल्या पाच वर्षापासून पहिल्या दहामध्ये कायम आहे. मनोरंजन क्षेत्रातात पाच सगळ्यात जास्त सर्च केल्या गेलेल्या महिलांपैकी सनी एक आहे. तसेच भारतात पहिले 10 सगळ्यात जास्त सर्च झालेल्या गाण्यांपैकी दोन गाणी बॉलीवुड मधली नाहीत. डेस्पॅसिटो आणि अॅड शॅरीनचं शेप ऑफ यु या गाण्यांचे व्हिडीओ भारतात मोठ्या प्रमाणात बघितल्या गेले आहेत.

 मनोरंजन आणि खेळ याव्यतिरिक्त काय होतं ट्रेंडमध्ये... 

भारतातील काही ठळक चालू घडामोडींविषयी देखील गुगल सर्च केले गेले. यापैकी, मोदी सरकारने देशातील सेवा व वस्तू करात (जीएसटी) केलेले बदल सर्वाधिक सर्च केले गेले. 'व्हॉट इज्' (एखाद्या गोष्टीचा अर्थ जाणणे) या श्रेणीत जीएसटीचा अर्थ सर्वाधिक जाणून घेतला गेला. तसेच 'हाउ टु' या श्रेणीत सरकारने सक्तीचे केलेल्या पॅन क्रमांक आधार कार्डला जोडण्याविषयी सर्च केले गेले. पॅन क्रमांक आधार कार्डला कसा लिंक करता येईल याची माहिती घेतल्या गेली. शिवाय, जिओ फोन खरेदीसाठी कशी नोंद करावी, बिटकॉन म्हणजे काय?, बिटकॉन कसे खरेदी करता येतील? उत्तर प्रदेश निवडणुक, उत्तर प्रदेशातील भाजप सत्ता, मिस वर्ल्ड सेरेमनी, त्यात मिस वर्ल्ड ठरलेली भारतीय मानुषी छिल्लर हे विषय गुगलवर चर्चेचे विषय ठरले. 

भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सध्या 450 दशलक्षांहून अधिक आहे आणि जरी देशातील एकूण लोकसंख्येच्या 30% पेक्षा हे प्रमाण कमी आहे. तरीही चीननंतर भारताचा इंटरनेट वापराच्याबाबतीत जगात देुसरा क्रमांक लागतो.  

 

Web Title: Marathi News Entertainment News Google search trend in India