कॅम्पस प्लेसमेंटलाही मंदीचा फटका 

कॅम्पस प्लेसमेंटलाही मंदीचा फटका 

मुंबई : अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅम्पसमधून करण्यात येणाऱ्या थेट भरतीला यंदा मंदीमुळे ग्रहण लागले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात थेट भरतीला सुरुवात होते. मात्र, यंदा नामांकित कंपन्या मंदीमुळे तोट्यात चालल्या असल्याने त्यांनी कॅम्प्सकडे पाठ फिरवली आहे. तसेच ज्या कंपन्या प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या आहेत, त्यांनीदेखील पॅकेजेस कमी केले आहेत. यंदा आयआयटीमध्ये पहिल्या टप्प्यातील प्लेसमेंट 1 डिसेंबरपासून सुरू होत असून यासाठी कंपन्यांची नोंदणी सुरू झाली आहे. 

आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट हंगामातील नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नामांकित कंपन्यांनी रस दाखविलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यंदा आयआयटी मुंबई प्लेसमेंट पूर्व ऑफर्सची संख्या 141 वरून 163 वर पोहोचली आहे. मात्र, पॅकेजची किंमत कमी केली असून कित्येक नामांकित कंपन्यांनी यंदा नोंदणीही केलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे; तर काही कंपन्यांनी प्लेसमेंट पूर्व ऑफर्स इंटर्नशिपमध्ये रुपांतरित केल्या आहेत.

आयआयटी कानपूर आणि खरगपूर येथे मागच्यावर्षी इतक्‍याच ऑफर्स आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. आयआयटी मुंबईला प्लेसमेंटमध्ये मंदीचा फटका बसला असताना अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही याचा फटका बसला आहे. काही नामांकित महाविद्यालये वगळता इतर महाविद्यालयांमध्ये अद्याप प्लेसमेंटची तयारीही सुरू झालेली नाही. तसेच इंटरर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. यंदा कंपन्यांना संपर्क साधून त्यांनी नेहमीसारखा प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती एका महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाकडून देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com