प्रफुल्ल पटेल यांना कधीही अटक होण्याची शक्यता

महायुतीचे गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना मनोज तिवारी 
महायुतीचे गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना मनोज तिवारी 

कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून त्याना या घोटाळ्यात अटक होण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट दिल्ली भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी कल्याण पूर्व मधील प्रचार सभेत केला. 

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ मंगळवार ता 15ऑक्टोबर रोजी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक समोरील मैदान मध्ये प्रचार सभा आयोजित केली होती, यावेळी खासदार मनोज तिवारी यांनी नरेंद्र मोदी यांच्यामुळे राजकारण मध्ये कसा आलो आणि जनतेची सेवा कशी करतो याचा दाखला देत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. 

पीएमसी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट केला ,नागरिकांनी बँकेत पैसे भरण्यापूर्वी ही बँक राष्ट्रवादी नेत्यांची बँक नाही ना याची काळजी घ्यावी आणि सरकारी बँकेत पैसे जमा करावे असे आवाहन दिल्लीचे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी कल्याण पूर्वेत मधील प्रचार सभेत केले 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com