बारावर्षीय मुलीचा विवाह सुरु होता आणि... 

बारावर्षीय मुलीचा विवाह सुरु होता आणि... 

शहापूर : कसाऱ्याजवळच्या मोखावणे गावातील बालविवाहाचा प्रकार रोखण्यात शहापूरच्या तहसीलदारांना यश आले आहे. येथील गावात दोन विवाह सुरू होते, त्यातील एक मुलगी १२ वर्षांची, तर मुलगा १८ वर्षांचा होता. याची कुणकुण लागताच प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून तो रोखला.

मोखावणे येथे मंगळवारी दुपारी दोन लग्नांची लगबग सुरू होती. त्यातील एक दुपारी १२, तर दुसरे ३ वाजता लागणार होते. यापैकी एक विवाह हा अल्पवयीन जोडप्याचा होता. मुलगी १२ वर्षांची, तर मुलगा १८ वर्षांचा होता. या प्रकाराची कुणकुण शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी आणि ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना लागली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी गाजावाजा न करता कसारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक के. बी. केंद्रे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी भरत गांजवे, ग्रामविकास अधिकारी पाकळे यांनी मोखवणे गाव गाठले.

पोलिस पाटील पांडुरंग भोईर यांना बरोबर घेऊन विवाहाच्या ठिकाणी पोहचले, तेव्हा एका बालिकेला हळद लावून डोक्‍याला बाशिंग बांधून लग्न मंडपात आणण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांना दिसले. पाचवीत शिकणाऱ्या या मुलीचे गावातीलच एका १७/१८ वर्षांच्या मुलाशी लग्न लावण्याची तयारी झाली होती. पण त्याच वेळी पोलिस व अन्य अधिकारी तेथे पोचल्याने मांडवातील मंडळींनी एकच गोंधळ घातला. मात्र, समयसूचकता दाखवत शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वाना शांत केले व स्थानिक महिला, बचतगट, शिक्षक यांना सोबत घेऊन मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. त्यानंतर हा प्रकार थांबला. या मुलीला पुढे शिकवण्याचे पालकांनी मान्य केल्याचे तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी
सांगितले आहे.

web title : Twelve-year-old girl marriage begins and 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com