बेळगाव : विसर्जन मिरवणूकीदरम्यान युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

बेळगाव - शहरात 'विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात आलेली असतानाच म्युझिक सिस्टिमवरून पडल्याने कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू झाला. राहुल सदावर (वय 38) असे युवकाचे नाव आहे.

बेळगाव - शहरात 'विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात आलेली असतानाच म्युझिक सिस्टिमवरून पडल्याने कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू झाला. राहुल सदावर (वय 38) असे युवकाचे नाव आहे.

राहूल विवाहित असून त्याला दोन लहान मुली आहेत. आज ( शुक्रवारी) सकाळी विसर्जन मिरवणुक हुतात्मा चौक परिसरात आल्यानंतर ही घटना घडली. जखमी झालेल्या युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व मंडळांनी म्युझिक सिस्टिम बंद करून गणेश मूर्ती पुढे नेण्यास सुरवात केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dead after falling from Music system in Ganesh Visarjan Procession

टॅग्स