विधी क्षेत्रात मध्यस्त पदासाठी पदवी अभ्यासक्रम : रविशंकर प्रसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नागपूर : देशाच्या विकासात विधी शिक्षण क्षेत्राने मोलाचे योगदान दिले. या क्षेत्रातील तरतुदी, माहिती व कायदे गोरगरिबांपर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे. त्यासाठी गोरगरिबांच्या न्यायासाठी प्रयत्नशील राहणारे व सर्वसामान्यांशी संवाद साधून प्रकरणांचा निवाडा करणारे "मध्यस्त' तयार व्हायला हवे. त्यासाठी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय कायदा व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले.

राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण (नासला) यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित सतराव्या अखिल भारतीय संमेलनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रसाद यांनी प्राधिकरणाऱ्या कार्याचे कौतुक केले. देशात उच्च न्यायालयांची संख्या वाढते आहे. हे युग शिकण्याचे आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत असून, देश डिजिटल क्रांतीच्या मार्गावर आहे. आज देशात 1.23 कोटी आधारकार्ड असून, त्यापैकी सुमारे 1.21 लोकांकडे मोबाईल आहे. या मोबाईल व माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून न्यायक्षेत्रातील ज्ञान, कलम व माहिती गरिबांपर्यंत पोहचे गरजेचे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Degree Course for Intermediate Degree in Law: Ravi Shankar Prasad