अरुंधती रॉयना लष्कराच्या जीपला बांधा: परेश रावल

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

मुंबई - काश्‍मीर खोऱ्यात भारतीय लष्करावर दगडफेक करणाऱ्यांना लष्कराच्या जीपसमोर बांधण्याऐवजी ज्येष्ठ लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांना बांधण्यात यावे, अशी परखड टीका प्रसिद्ध अभिनेते व संसद सदस्य परेश रावल यांनी आज (सोमवार) केली.

बुकर पारितोषिक विजेत्या रॉय यांची काश्‍मिरी फुटीरतावाद्यांसंदर्भातील भूमिका कायमच वादग्रस्त ठरली आहे. काश्‍मीर प्रश्‍नासहित मानवाधिकारवादी कार्यकर्त्या असलेल्या रॉय यांची नक्षलवाद्यांसंदर्भातील मतेही कायमच राष्ट्रवाद्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरली आहेत. रॉय या ट्‌विटरवर नाहीत.

दरम्यान, रावल यांच्या या टीकेस संमिश्र पाठिंबा लाभला आहे. काही ट्‌विटरर युजर्सनी रावल यांना पाठिंबा दर्शवित लष्कराच्या जीपसमोर बांधण्यासाठी अन्य काही नावे सुचविली आहेत! मात्र काही जणांनी रावल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी रावल यांच्या या ट्‌विटच्या पार्श्‍वभूमीवर रावल हे आदर्श संसद सदस्य असल्याचे दिसून येत असल्याची उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे.

दरम्यान, रावल यांच्या या टीकेचे दूरगामी राजकीय पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.

Web Title: ‘Tie Arundhati Roy to army jeep’: Paresh Rawal