देशात 1.53 लाख आत्महत्या; महाराष्ट्र टाॅपवर; NCRB चा धक्कादायक अहवाल

Farmer
Farmeresakal
Summary

2019 च्या तुलनेत 2020 मध्ये आत्महत्येच्या प्रकरणांत वाढ झालीय.

नवी दिल्ली : भारतात सन 2020 मध्ये आत्महत्येची 1,53,052 प्रकरणं म्हणजेच, दररोज सरासरी 418 प्रकरणं नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 10,677 प्रकरणं कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आलीय. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं (NCRB) आपल्या वार्षिक अहवालात म्हटलंय, की 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये आत्महत्येच्या प्रकरणांत वाढ झालीय. 2019 मध्ये त्यांची संख्या 1,39,123 होती. तर, देशात आत्महत्येचं प्रमाणही (प्रति लाख लोकसंख्येमागे) वाढले असून 2019 मध्ये ते 10.4 होते. मात्र, गेल्या वर्षी ते 11.3 इतके झालेय.

अहवालात म्हटलंय, की 2020 या वर्षात कृषी क्षेत्रात 10,677 लोकांनी (5,579 शेतकरी आणि 5,098 शेतमजूर) आत्महत्या केल्या आहेत, जे देशातील आत्महत्यांच्या (1,53,052) सात टक्के आहे. अहवालानुसार, 5,579 शेतकरी आत्महत्या प्रकरणांपैकी एकूण 5,335 पुरुष आणि 244 महिला होत्या. तर 2020 मध्ये शेतमजुरांनी केलेल्या 5,098 आत्महत्यांपैकी 4,621 पुरुष आणि 477 महिला होत्या. महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण 19,909 गुन्हे नोंदवले गेले आहेत, जे एकूण प्रकरणांच्या 13 टक्के जास्त आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 16,883, मध्य प्रदेशात 14,578, पश्चिम बंगाल 13,103 आणि कर्नाटकमध्ये 12,259 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. देशातील एकूण आत्महत्यांपैकी तामिळनाडूमध्ये 11 टक्के, मध्य प्रदेशात 9.5 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 8.6 टक्के आणि कर्नाटकात 8 टक्के आत्महत्या झाल्या आहेत.

Farmer
प्रेमप्रकरणातून गरोदर; स्वतःला मुलासह खोलीत घेतलं कोंडून अन् YouTube वर..

दरम्यान, या पाच राज्यांची आकडेवारी एकत्र केली, तर देशभरात नोंदवलेल्या एकूण आत्महत्यांपैकी 50.1 टक्के प्रकरणं आहेत, तर उर्वरित 23 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 49.9 टक्के प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेशचा वाटा 16.9 टक्के आहे. असं असतानाही या राज्यात आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. एकूण आत्महत्येच्या केवळ 3.1 टक्के प्रकरणे उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आली आहेत. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या केंद्रशासित प्रदेश दिल्लीमध्ये आत्महत्येची 3,142 प्रकरणं नोंदवण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आलंय. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली अव्वल आहे, तर त्यानंतर पुद्दुचेरीमध्ये 408 प्रकरणं नोंदवली आहेत. 2020 मध्ये देशातील 53 प्रमुख शहरांमध्ये एकूण 23,855 आत्महत्या झाल्या आहेत, असंही अहवालात म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com