कोरोनाची गुगलमध्येही एन्ट्री; कर्मचाऱ्यास लागण

वृत्तसंस्था
Friday, 13 March 2020

सूत्रांच्या माहितीनुसार, आता भारतातील गुगल कार्यालयातही शिरकाव केला आहे. गुगल ऑफिसमधील एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. 

बंगळूर : कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातलेला असून आतापर्यंत साडेचार हजारहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. ७०हून अधिक रूग्ण भारतातच सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आता भारतातील गुगल कार्यालयातही शिरकाव केला आहे. गुगल ऑफिसमधील एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचे १४ रुग्ण; कर्नाटकात देशातील पहिला बळी

गुगलच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणं आढळून आली होती. त्यामुळे त्याची टेस्ट केल्यानंतर तो कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यामुळे त्याला विलगीकरण विभागात ठेवण्यात आले आहे. तसेच गुगल ऑफिसही काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. तर कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. तसेच गुगलची अनेक कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ज्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे, तो नुकताच विदेशातून भारतात परतला होता. गुगलने या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. सुरवातीला या रूग्णाला ताप व अंगदुखीचा त्रास झाला होता. तो परदेशातून आल्यामुळे त्याला लगेच चाचणी करण्यास सांगितले. कर्नाटकातही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने लोकांना काळजी गेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तर कोरोनाचा पहिला बळी कर्नाटकातील कलबुर्गी येथेच गेला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 corona patient detected in Google office Banglore