उत्तर प्रदेशात रेल्वे स्टेशनजवळ बॉम्बस्फोट; 1 जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

संत कबीर नगर (उत्तर प्रदेश)- खलिलाबाद गावाजवळ असलेल्या रेल्वे स्टेशनजवळ आज (मंगळवार) सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात 1 जण जखमी झाला आहे. परिसरातून तीन बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू थापा हे रेल्वे स्टेशनजवळ कचरा गोळा करत होते. यावेळी कमी तिव्रता असलेल्या क्रुड बॉम्बचा स्फोट झाला. यामध्ये थापा जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले. परिसरातून कमी तिव्रतेचे तीन जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आले असून, हे बॉम्ब रेल्वे ट्रॅकवर पेरण्यात आले होते.
 
संत कबीर नगर परिसरातील रेल्वे ट्रॅक उडवून मोठा घातपात घडवण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. 7 मार्च रोजी भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. यामध्ये दहा जण जखमी झाले होते.

Web Title: 1 injured in crude bomb explosion near railway track in UP