झारखंड निवडणुकीला हिंसक वळण; गोळीबारात एक ठार

वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

झारखंडमध्ये मतदानावेळी गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. झारखंड विधानसभा दुसऱ्या टप्प्याला हिंसक वळण लागले असून गुमला जिल्ह्यातील सिसईमध्ये मतदान केंद्रावर मतदारांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

रांची : झारखंडमध्ये मतदानावेळी गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. झारखंड विधानसभा दुसऱ्या टप्प्याला हिंसक वळण लागले असून गुमला जिल्ह्यातील सिसईमध्ये मतदान केंद्रावर मतदारांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पोलिसांनी मतदान केंद्राच्या आसपासचा परिसर सील केला असून सीआरपीएफची तुकडी गावामध्ये रवाना करण्यात आली आहे. या गोळीबारात काही जण जखमी झाले आहेत. यापैकी एका गंभीर जखमीला रांचीला हलविण्यात आले आहे. मतदान केंद्रावर हिसंक वळण लागल्यावर निवडणूक कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने पोलिसांनी ईव्हीएम ताब्यात घेतले. मतदारांना जबरदस्तीने मतदान करण्यापासून रोखण्यात येत होते. यानंतर तेथे दगडफेक करण्यात आली. 

राज ठाकरे करतात या एकमेव ट्विटर अकाउंटला फॉलो

मतदारांकडून मतदान केंद्रावर दगडफेक करण्यात आली. त्याच्यावर पोलिसांनी गोळीबारही केला. मतदारांना रोखण्यात येत असल्याचा आरोप करत सुरक्षा पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे मतदान अधिकारी दुसऱ्या खोलीत लपले. पोलिसांनी झाडलेली गोळी लागल्याने जिलानी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. या ठिकाणी दगडफेक सुरूच असून तणावाचे वातवरण आहे, असी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

मोदी पुण्यात आले पण हे काम करायला नाही विसरले

दरम्यान, हॉस्पिटलमध्येही मोठ्या संख्येने लोक पोहोचले असून निवडणूक आयोगाने या प्रकरणी अहवाल मागविला आहे. तर अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 killed 2 injured as cops open fire outside Jharkhand poll booth