Massive jams : 2 तासात 1 किमी प्रवास! एवढा ट्रॅफिक जॅम, की शाळकरी मुले रात्रीच घरी पोहोचले

Massive jams
Massive jams
Updated on

बंगळुरू - बेंगळुरूला बुधवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावेळी वाहने तासनतास रस्त्यावर अडकून पडली होती. त्यातच अनेकांना ब्रेकडाउनचा सामना करावा लागला.

Massive jams
Weather Update : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर पाऊसही लावणार हजेरी; आज 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

शहरातील आऊटर रिंग रोड (ओआरआर) भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात पाच तासांहून अधिक काळ लोक अडकून पडले होते.

शेतकरी आणि 'कर्नाटक जल संरक्षण समिती'ने पुकारलेल्या बेंगळुरू बंदच्या एका दिवसानंतर वाहतूक कोंडी झाली होती. कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता.

ट्विटरवर, अनेक वापरकर्त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या कार्यालयात किंवा घरी परतताना वाहतूक कोंडीमुळे अनेक तास अडकून पडले होते. त्यांनी इतरांना रात्री 9 वाजेपूर्वी कार्यालयातून बाहेर पडू नका किंवा ORR, मराठाहल्ली, सर्जापुरा आणि सिल्कबोर्ड मार्गांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला होता.

एका नेटकऱ्याने म्हटलं की, मागील 3 तासात 5 किमी प्रवास. हे भयानक आहे!", एका वापरकर्त्याने लिहिले की 1 किमी अंतर कापण्यासाठी दोन तास लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com