Azamgarh Jail : 2500 कैदी असलेल्या आझमगड कारागृहात 10 कैद्यांना HIV ची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10 prisoners infected with HIV in Azamgarh Jail

कारागृहात कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्यानंतर प्रशासनानं अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय.

Azamgarh Jail : 2500 कैदी असलेल्या आझमगड कारागृहात 10 कैद्यांना HIV ची लागण

आझमगड : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आझमगड जिल्हा कारागृहात (Azamgarh District Jail) 10 कैद्यांना एचआयव्हीची (HIV) लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व कैदी (Prisoner) इटौरा येथील जिल्हा कारागृहात आहेत. सध्या इतर कैद्यांच्या तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

आरोग्य विभागानं याचा अहवाल कारागृह प्रशासन आणि सरकारला दिला आहे. कारागृहात कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्यानंतर प्रशासनानं अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. आझमगड जिल्ह्यातील इटौरा इथं बांधण्यात आलेल्या नवीन हायटेक जेलमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार, कैद्यांची एचआयव्ही चाचणी केली जात आहे. जेणेकरून किती कैदी एचआयव्ही बाधित आहेत हे कळू शकेल.

हेही वाचा: Karnataka : दलित मुलानं हिंदू देवतेला स्पर्श केला म्हणून ठोठावला 60 हजारांचा दंड

सध्या कारागृहात एकूण 2500 कैदी आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला कैद्यांचा समावेश आहे. कारागृहात सुरू असलेल्या एचआयव्ही चाचणी प्रक्रियेत कैदी सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात आलं. आतापर्यंत निम्म्या कैद्यांची चाचणी झाली आहे. यामध्ये एकूण 10 एचआयव्ही बाधित कैदी आढळून आले आहेत.

हेही वाचा: Kolhapur : दहशतवाद्यांना आर्थिक मदत; कोल्हापुरातही NIA नं गुप्तता पाळत टाकला छापा

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2500 कैद्यांपैकी आतापर्यंत एकूण 1322 कैद्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दहा कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पाच कैद्यांना एचआयव्ही असल्याची पुष्टी झालीय, तर 5 कैद्यांच्या चाचणीसाठी दुसऱ्यांदा प्रयोगशाळेत अहवाल पाठवण्यात आला आहे. कारागृह प्रशासन त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहे. 10 जणांमध्ये एचआयव्हीचा संसर्ग कसा पसरला याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: 10 Prisoners Infected With Hiv In Azamgarh Jail Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..