१०० कोटी डोस पूर्णत्वाकडे; सरकारचं लाल किल्ल्यावर सेलिब्रेशन!

गीत आणि ऑडिओ-व्हिज्युअल फिल्मचं होणार प्रकाशन
Vaccination
Vaccination

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे १०० कोटी पूर्ण होणार असल्यानं केंद्र सरकारनं याचं सेलिब्रेशन करण्याचं नियोजन केलं आहे. यानिमित्त लसीकरण मोहिमेवर एक नवं गीत आणि ऑडिओ व्हिज्युअल फिल्मचं प्रकाशन होणार आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर एक गीत आणि ऑडिओ-व्हिज्युअल फिल्मचं प्रकाशन करण्यात येणार आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत बुधवारपर्यंत ९९.१२ कोटी लसीकरण झालं आहे.

Vaccination
रुपाली चाकणकर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

दरम्यान, उद्या (गुरुवार) लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा मिळून १०० कोटींचा टप्पा पार होईल. त्यामुळे ही सरकारसाठी मोठी कामगिरी ठरणार आहे. देशात १६ जानेवारी २०२१ रोजी पहिला कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला होता. त्यानंतर उद्या गुरुवार, २१ ऑक्टोबर २०२१ देशात १०० कोटी वा डोस पूर्ण होईल.

जनतेनं लसीकरणात योगदान द्यावं

दरम्यान, मांडवीय यांनी जनतेला आवाहन केलं की, देश लसीचं शतक करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशवासीयांना माझं अपील आहे की ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यांनी तात्काळ लस घेऊन भारताच्या ऐतिहासिक लसीकरणाच्या प्रवासात आपलं योगदानं द्यावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com