रुपाली चाकणकर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

राज्यातील महिलांच्या प्रश्नावर आक्रमक शैलीतील कामामुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आहेत.
Rupali Chakankar.
Rupali Chakankar.

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाकणकर यांचं नाव चर्चेत होतं. अखेर आज त्यांची नियुक्ती झाल्याचं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ट्विटद्वारे जाहीर केलं.

दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं, "राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! राज्यातील महिलांच्या हक्कासाठी आपण खंबीरपणे काम कराल हा तुमच्या आजवरच्या प्रवासावरून विश्वास वाटतो!"

Rupali Chakankar.
राजीनाम्यानंतर सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, चर्चांना उधाण

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. या पदावर असताना राज्यातील महिलांच्या प्रश्नावर केलेल्या आक्रमक शैलीतील आंदोलनांमुळे त्या कायम राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिल्या. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागी चाकणकर यांची वर्णी लागली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com