त्रिपुरात पावसामुळे शेतीचे 100 कोटीचे नुकसान 

100 crore loss of land due to rain in Tripura
100 crore loss of land due to rain in Tripura

उदयपूर - संततधार पावसामुळे उदयपूर भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या संम्बरुम भागात 100 कोटीहून अधिक नुकसान झाल्याचे आमदार संकर राय यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

त्रिपुराचे कृषिमंत्री परनजितसिंह रॉय यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि प्रशासनाला आपत्तीग्रस्त भागाला मदत करण्याचे आदेश दिले. या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा थेट अहवाल पाठवावा, असे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. या पुरामुळे शेती उत्पादन आणि उत्पादकता, घर, रस्ते यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दक्षिण त्रिपुरातील संबरूम जिल्ह्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी नऊ मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत, असे आमदार संकर रॉय यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com