पाकच्या 100 सैनिकांची मुंडकी उडवा : रामदेवबाबा

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी देशातील 125 कोटी नागरिकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले आहे. सरकारने आता कडक कारवाई करावी. पाकिस्तानने पुन्हा असे कृत्य करू नये.

नवी दिल्ली - दोन भारतीय जवानांचा पाकने शिरच्छेद केल्याच्या घटनेनंतर योगगुरु रामदेवबाबांनी संतप्त प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या 100 सैनिकांचे मुंडके उडविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदेवबाबा म्हणाले, की पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कृत्याबद्दल नवी दिल्लीने इस्लामाबाद मोठी किंमत मोजायला लावायला हवी. पाकिस्तानी सैन्यातील 100 सैनिकांची मुंडकी उडवून जशास तसे उत्तर दिले पाहिजे. भारत हा शक्तीशाली देश आहे. त्यामुळे भारताने या कृत्याला कठोर उत्तर दिले पाहिजे. माझा अहिंसेवर विश्वास आहे, पण आता अशा घटना खूप झाल्या आहेत. पाकिस्तानकडून हिंसा होत असेल, तर त्याला उत्तर तसेच दिले पाहिजे. पाकिस्तानने आता आपल्या 100 सैनिकांना गमाविण्यास तयार रहावे.

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी देशातील 125 कोटी नागरिकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले आहे. सरकारने आता कडक कारवाई करावी. पाकिस्तानने पुन्हा असे कृत्य करू नये, असे रामदेवबाबांनी म्हटले आहे.

Web Title: 100 Pakistani soldiers should be beheaded, says Baba Ramdev