नोटाबंदीनंतर भाजप शासित राज्यात सर्वाधिक मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीनंतर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार असलेल्या राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओ. ब्रायन यांनी दिली.

ब्रायन यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, 'मोदींनी केलेल्या नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक म्हणजे 7-7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दोन्हीही राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. नोटाबंदीनंतर एटीएम व बँकांच्या रांगमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परंतु, नोटाबंदीमुळे यांचा मृत्यू झाल्याचे भाजप मानण्यास तयार नाही.'

दरम्यान, ब्रायन यांनी गुरुवारी (ता. 15) ट्विट केले होते. ब्रायन यांच्या ट्विटला अनेकांनी रिट्विट करत प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत.

Web Title: 100 people died due to demonetisation nov 8 to dec 15