‘नवी दिल्ली-एनसीआर’मधील भटक्या श्वानांना कोंडवाड्यात ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यानंतर देशातील भटक्या श्वानांच्या समस्येची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. देशभरात गेल्या काही वर्षांत श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, दररोज देशात १० हजार श्वान नागरिकांचा चावा घेतात, असे आकडेवारी सांगते.