बांगलादेशात 105 तस्कर यमसदनी 

पीटीआय
बुधवार, 30 मे 2018

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात बांगलादेशात मोहीम सुरू असून, याअंतर्गत सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत 12 तस्करांना ठार करण्यात आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. त्यामुळे या मोहिमेत ठार झालेल्यांची संख्या आता 105वर पोचली आहे. 
 

ढाका - अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात बांगलादेशात मोहीम सुरू असून, याअंतर्गत सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत 12 तस्करांना ठार करण्यात आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. त्यामुळे या मोहिमेत ठार झालेल्यांची संख्या आता 105वर पोचली आहे. 

मागील पंधरा दिवसांपासून संपूर्ण बांगलादेशात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र, या कारवाईबाबत मानवाधिकार संघटना आणि विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून, हे हत्यासत्र थांबविण्याची विनंती केली आहे. तस्करांकडून हल्ले झाल्यामुळे सुरक्षा दलांना शस्त्रांचा वापर करावा लागला असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे.

Web Title: 105 smugglers killed in Bangladesh

टॅग्स