Train Accident : वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले; 8 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Train Accident

Train Accident : वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले; 8 जण जखमी

राजस्थानमधील पाली येथे बांद्रा-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे सोमवारी पहाटे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे 3.27 वाजता झाला आहे. राजस्थानमधील जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा सेक्शनवर रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरल्याचे उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओ यांनी सांगितले आहे.

या दुर्घटनेमध्ये 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे तर दुर्घटनेत वित्तहानी झालेली नाही. अधिक माहिती देताना सीपीआरओने सांगितले की, उत्तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर उच्च अधिकारी रेल्वेच्या जयपूर मुख्यालयात या दुर्घटनेवर लक्ष देत आहे. यासोबतच रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा: Delhi crime : नराधमांनी फरफटत नेलेली तरुणी घरात एकटीच कमावणारी होती

त्याचबरोबर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत या मार्गावर ब्लॉक करण्यात आला आहे. या मार्गावरील चार एक्सप्रेसचे मार्गही बदलण्यात आलेत. या शिवाय प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाचे उच्चअधिकारी घटनास्थळी रवाना होत आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी हे अधिकारी घटनास्थळी येणार आहे. तसेच जयपूर येथील मुख्यालयातील कंट्रोल रुममधून घटनेवर लक्ष ठेवलं जात आहे.

हेही वाचा: Pankaja Munde : पंकजा मुंडेंना डावलण्याचं नेमकं कारण काय? भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही

टॅग्स :accidentrailway station