चारा, कोळशानंतर आता झाला कंडोम गैरव्यवहार!

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

'एमपीएसीएमएसएस'ला कंडोम खरेदीचे काम

- दोन सरकारी कंपन्यांचाही समावेश

नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत कोळसा, चारा, 2 जी स्पेक्ट्रम यांसह विविध गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता कंडोम गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. देशात कंडोम तयार करणाऱ्या 11 कंपन्यांनी सरकारला कोट्यवधींचा गंडा घातला. यामध्ये दोन सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे.

'कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया'ने (सीआयआय) या संदर्भात चौकशी केली. यादरम्यान हा कंडोम गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. या गैरव्यवहारात कंडोम तयार करणाऱ्या 11 कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये सरकारी कंपनी 'एचएलएल लाईफकेअर' आणि 'टीटीके प्रोटेक्टिव डिव्हायसेस लिमिटेड' या सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. 

2010 ते 2014 या वर्षांदरम्यान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मोफत कंडोम वितरणासाठी मोठ्या प्रमाणात कंडोम खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 11 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मात्र, या कंपन्यांनी ठरवून कंडोमचे विक्री दर वाढवून सांगितले होते.

'एमपीएसीएमएसएस'ला कंडोम खरेदीचे काम

आता 'मेडिकल प्रोक्युअरमेंट एजन्सी सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी'ला ('एमपीएसीएमएसएस) कंडोम खरेदी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 Companies and 2 Government Companies involved in Condom Scam