esakal | टेम्पोची ट्रकला धडक; 11 वऱ्हाडी ठार

बोलून बातमी शोधा

टेम्पोची ट्रकला धडक; 11 वऱ्हाडी ठार

- ट्रेम्पोने ट्रकला धडक दिल्याने झाला भीषण अपघात.

टेम्पोची ट्रकला धडक; 11 वऱ्हाडी ठार
sakal_logo
By
वृत्तसंस्था

बडोदा : ट्रेम्पोने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. हा ट्रेम्पो लग्नाच्या वरातीसाठी जात असल्याची माहिती मिळत आहे. गुजरातमधील बडोद्याजळील रणू गावात काल (शनिवार) हा अपघात झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बडोदा जिल्ह्यात एका व्यक्तीची वरात निघाली होती. सर्व वऱ्हाडी मंडळी टेम्पोतून प्रवास करत होते. पदरा तालुक्यातील रणू आणि महुवडदरम्यान वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे टेम्पोमध्ये अनेकजण अडकले होते. टेम्पोमध्ये अडकलेल्या वऱ्हाड्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच डॉक्टरांनी या 11 जणांना मृत घोषित केले. तर जखमींवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी बडोदा येथे पाठवण्यात आले आहे. यातील जखमींवर बडोद्यातील सर सयाजी जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वारिस पठाण यांनी शब्द मागे घेतले, माफी नाहीच 

दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.