Coronavirus : देशात कोरोनाचे 11 बळी, तर कोरोनाग्रस्तांची संख्या....

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

देशातील सर्व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, विनाकारण घराबाहेर पडू नका असे सर्व राज्यातील प्राशासननाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचे असल्याने घरीच थांबण्याचा इशारा पोलिसांनीही दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घतालेले असतानाच भारताने मोठ्या प्रमाणात खबरदारी घ्यायला सुरवात केली आहे. भारत पुढील २१ दिवस लॉकडाऊन स्थितीत असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मात्र, असे असूनही देशात कोरोनाचा फैलाव काही कमी झालेला नाही. देशात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून कोरोनाग्रस्तांची संख्या ५३६ वर पोहोचली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून पुढील २१ दिवस कोणीही घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यामुळे संपूर्ण देश हा १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये गेला असून सर्व राज्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहे. 

अशातच तमिळनाडूमधील मदुराई येथे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला असून, देशातील संख्या ११ वर पोहोचली आहे. या रूग्णाला कोरोनासह अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनचा आजार होता. आम्ही आमच्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करुनही वाचवू शकलो नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर म्हणाले. तसेच त्याने कोणताही परदेश प्रवास केलेला नव्हता. राजाजी हॉस्पिटलमध्ये या रुग्णाचे निधन झाले. तामिळनाडूत करोना बाधितांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी आणखी सहा नवीन रुग्ण आढळून आले. यात तीन महिला रुग्णांचा समावेश आहे.

देशातील सर्व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, विनाकारण घराबाहेर पडू नका असे सर्व राज्यातील प्राशासननाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचे असल्याने घरीच थांबण्याचा इशारा पोलिसांनीही दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 death in india due to Coronavirus and 536 are corona positive