मध्यप्रदेशमध्ये विसर्जनात विघ्न; बोट उलटून 11 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनात विघ्न आले असून 11 जणांवर मृत्यू ओढावला आहे. खटलापूरा मंदिर घाट परिसरात शुक्रवारी (ता. 13) सकाळी बोट उलटून 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर उपस्थित आहे. 

भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनात विघ्न आले असून 11 जणांवर मृत्यू ओढावला आहे. खटलापूरा मंदिर घाट परिसरात शुक्रवारी (ता. 13) सकाळी बोट उलटून 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर उपस्थित आहे. 

गणेश विसर्जनासाठी खटलापूर मंदिर घाट येथे बोट घेऊन गणेशभक्त गेले होते. बोटीवर प्रमाणापेक्षा जास्त लोक उसल्यामुळे बोट उलटली. या दुर्घेटनेतून नऊ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, 11 जणांना बुडून मृत्यू झाला. तर आणखी दोन भाविक बेपत्ता आहेत. एनडीआरफ व एसडीईआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 killed in Madhya Pradesh as boat capsizes during Ganesh Inmmersion