11 मृतदेह, 11 नोंदवह्या, 11 पाईप, काय आहे 11 क्रमांकाचे रहस्य..

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

नवी दिल्ली : बुऱ्हाडी येथील 11 जणांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांच्या हातात अद्याप कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे हाती लागलेले नसले तरी हे प्रकरणात तंत्र-मंत्र, काळी जादू किंवा धार्मिक विधीशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यात 11 क्रमांकानेही आता या प्रकरणातील गूढ वाढवले आहे. सुरुवातीला 11 मृतहेह आणि नंतर घराबाहेर दिसणारे 11 पाईप याचा संबंध जोडण्यात आला. पण हे एवढ्यावरच थांबत नाही. घरात इतरही काही गोष्टींबरोबर 11 क्रमांकाचा संबंध असल्याचे समोर येत आहे.

11 मृतदेह
हे प्रकरण समोर आले तेव्हा त्या घरामध्ये कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळून आले. सुरुवातीला 11 जणांचे मृतदेह असल्याकडे फारसे लक्ष वेधले गेले नसले तरी त्यानंतर या क्रमांकाने या प्रकरणातले गुढ लाढविले आहे. 

11 नोंदवह्या
या घरात 11 नोंदवह्या देखील सापडल्या आहे. ज्या 11 वर्षांपासून लिहिल्या गेल्या आहेत. या नोंदवह्यांमध्ये नेमकी कोणती माहिती आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील गुढ आणखीनच वाढले आहे.

11 पाईप
पोलिस तपासात घराच्या बाहेर 11 पाईप अढळले होते. या पाईपांमध्ये 4 पाईप सरळ आणि 7 वळालेले होते. तर मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे याचाही संबंध सध्या जोडला जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी मात्र हे पाईप फक्त व्हेंटिलेशनसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.

11 खिडक्या
आतम्हत्या केलेल्या कुटुंबीयांच्या या घराला खिडक्याही 11 आहेत. त्यांनी घराला 11 खिडक्या ठरवून केल्या की हाही एक योगायोग होता, याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.

11 पायऱ्या
खिडक्यांची 11 ही संख्या योगायोग असे म्हणायचे झाले तर, घरात वर जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत, त्यांची संख्याही 11 असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही अंद्धश्रद्धा असल्याचे बोलले जात आहे. 

11 अँगल
एवढेच नाही तर घराच्या दाराच्या वर एक जाळी लावण्यात आली आहे. या जाळीला 11 अँगल असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा एक नव्हे तर अनेक गोष्टींशी 11 क्रमांकाचा संबंध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरंच हा काही अंधश्रद्धेचा प्रकार होता का? आणि त्यात 11 क्रमांकाशी संबंध आहे का? या दिशेने तपास सुरु आहे.

Web Title: 11 members from one family suicide in delhi