धक्कादायक ! पाकिस्तानातून आलेल्या एकाच कुटुंबातील ११ जणांचे मिळाले मृतदेह

टीम ई सकाळ
Sunday, 9 August 2020

पाकिस्तानमधून आलेल्या एका स्थलांतरित कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह राजस्थानमधील एका गावात मिळाले आहेत. ही धक्कादायक घटना जोधपुरपासून जवळच असलेल्या (Jodhpur) देंचू भागातील अचावता गावामध्ये घडली आहे. या घटनेमागील कारण आणखी समजू शकलेले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.

जोधपूर : पाकिस्तानमधून आलेल्या एका स्थलांतरित कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह राजस्थानमधील एका गावात मिळाले आहेत. ही धक्कादायक घटना जोधपुरपासून जवळच असलेल्या (Jodhpur) देंचू भागातील अचावता गावामध्ये घडली आहे. या घटनेमागील कारण आणखी समजू शकलेले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सूंपर्ण कुटुंब हे पाकिस्तानवरून राजस्थानमध्ये स्थलांतरित झालेले होते अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राजस्थानच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमधून आलेले स्थलांतरित लोक राहतात. अशात एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे एकूण १२ जणांचे कुटुंब होते त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ११ जणांमध्ये ०५ लहान मुलांचा समावेश आहे. या ११ जणांना विष देऊन त्यांची हत्या केली गेली असल्याचेही पोलिसांनी प्राथमिक अंदाजात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील नर्स असणारी बहिण आपल्या भावाला राखी बांधण्याकरिता जोधपूरला आली होती. त्यानंतर ती इथेच राहत होती. पोलिसांच्या अंदाजानुसार या बहिणीनेच घरातील १० लोकांना विष देऊन नंतर स्वतःही विष घेतले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, कुटुंबातील उर्वरित एक सदस्य आधीच शेतात निघून गेला होता. रात्रीच्या वेळी तो शेतातच राहिला आणि तिथेच झोपी गेला. सकाळी घरी येऊन पाहिल्यानंतर त्याला ही धक्कादायक घटना घडल्याचे समजले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 members of Pakistan Hindu migrant family found dead in Jodhpur