अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील 11 जणांना अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

उत्तर गोव्यातील बागा समुद्र किनाऱ्यावरील एका हॉटेलमध्ये या दोघी मुली त्यांच्या पालकांसह बसल्या होत्या. त्यावेळी या गटाने तेथे येऊन या मुलींचा विनयभंग केला.

पणजी : गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील 11 जणांना दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पीडित दोघी चुलत बहिणी असून, 11 जणांच्या गटाने या दोघींचा समुद्राजवळ विनयभंग केला. 

उत्तर गोव्यातील बागा समुद्र किनाऱ्यावरील एका हॉटेलमध्ये या दोघी मुली त्यांच्या पालकांसह बसल्या होत्या. त्यावेळी या गटाने तेथे येऊन या मुलींचा विनयभंग केला. तसेच त्यांनी मुलींचे फोटोही काढले. जेव्हा त्यांचे फोटो काढले जात असल्याचे समजल्यानंतर त्यांनी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. मात्र, तेव्हा त्यांनी कानाखाली मारली आणि त्यानंतर मारहाण करण्यास सुरवात केली, असे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  

दरम्यान, पीडित अल्पवयीन मुली 17 आणि 16 वर्षांच्या असून, त्यांच्या विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. यातील आरोपी राज्यातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

Web Title: 11 tourists from Pune arrested for molesting two minors in Goa