११ वर्षांचा मुलगा २० तास फ्रीजमध्ये

वादळापासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो २० तास फ्रीजमध्ये राहिला.
phillipines crisis
phillipines crisisgoogle

मुंबई : संपूर्ण एक दिवस फ्रिजमध्ये राहिल्यानंतर फिलिपिन्समधील एका ११ वर्षीय मुलाचा जीव वाचला. वादळानंतर झालेल्या भूस्खलनापासून वाचण्यासाठी या मुलाने फ्रीजमध्ये आश्रय घेतला होता. सीजे जैस्मे नावाचा हा मुलगा आपल्या कुटुंबासोबत घरात होता. बेबे शहरामध्ये झालेल्या भूस्खलनानंतर त्याच्या घरात पाणी शिरले. बचावकार्य सुरू असताना तो तुटलेल्या फ्रीजमध्ये दिसून आला.

phillipines crisis
‘स्वाती’ नक्षत्रामुळे पावसाऐवजी ‘वादळ’!

भूस्खलनानंतर चिखल आपल्या घराकडे सरकताना पाहून जैस्मे फ्रीजमध्ये जाऊन बसला. वादळापासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो २० तास फ्रीजमध्ये राहिला. हा फ्रीज नदीच्या किनाऱ्यावर तरंगताना बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना दिसला. त्यांनी तो फ्रीज चिखलातून बाहेर काढला व मुलाला वाचवले.

फ्रीजमधून बाहेर काढत असताना मुलाला खूप भूक लागली असल्याचे त्याने बचाव पथकाला सांगितले. त्यांनी जैस्मेला एका स्ट्रेचरवर ठेवले. त्याचा पाय मोडला होता. त्यामुळे त्याला आधी प्रथमोपचार देण्यात आले आणि नंतर रुग्णालयात नेऊन पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

phillipines crisis
पुणे: भूस्खलन रोखण्यासाठी समितीचे गठण

आता जैस्मेची प्रकृती स्थिर आहे. त्याची आई आणि लहान भाऊ बेपत्ता आहेत. वडील एक दिवस आधीच भूस्खलनामध्ये मृत्युमुखी पडले. वादळानंतर बेबेमध्ये २०० नागरिक जखमी झाले व १७२ मृत्युमुखी पडले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वादळामुळे २० कोटी नागरिक स्थलांतरित झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com