राजधानीत रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कर्मचाऱयाला अटक केली आहे.

नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कर्मचाऱयाला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागातील ईएसआय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या रुग्णालयात एक अकरा वर्षीय मुलगी उपचारासाठी दाखल झाली होती. रुग्णालयात साफ सफाईचे काम करणाऱ्या एकाने या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱयाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडीत मुलीवर उपचार सुरू आहेत. पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांना पत्र लिहीले असून, न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राजधानीत गेल्या आठवड्यात दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. एका प्रकरणात एका सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. दुसऱया एका प्रकरणात सात वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही मुलगी घराच्या अंगणात खेळत असताना हा प्रकार घडला होता पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर तो उघड झाला होता.

Web Title: 11 year old raped by hospital housekeeping staffer in delhi