'भारत बंद' च्या हिंसाचारदरम्यान बिहारमध्ये 12 जण जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

या 'भारत बंद'मध्ये 12 जण जखमी झाले आहेत. यात रास्ता रोको आणि बाजारपेठा बंद करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

नवी दिल्ली : 'भारत बंद' च्या हिंसाचारदरम्यान बिहारमध्ये 12 जण जखमी झाले आहेत. या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा आणि शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Bharat bandh violence today bihar

नोकरीत आणि शिक्षणात मिळणाऱ्या आरक्षणाविरोधात आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली. मात्र, याला पाठिंबा देण्यासाठी कोणतीही संघटना पुढे आली नाही. पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलत आहेत. या 'भारत बंद'मध्ये 12 जण जखमी झाले आहेत. यात रास्ता रोको आणि बाजारपेठा बंद करण्यासाठी दबाव आणला जात आहे. इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि दलितांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजला होता. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पाचारण करण्यात आले. 

दरम्यान, या 'भारत बंद'दरम्यान राजस्थान, मध्यप्रदेशात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

Web Title: 12 injured in clashes in Bihar during Bharat Bandh security increased in MP and Rajasthan