मोबाईलच्या स्फोटामुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

रवीसोबत त्याचा आणखी एक मित्र त्याच्या सोबत होता, तोही जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

रायपूर : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत असताना हातातच मोबाईलचा स्फोट होऊन 12 वर्षीय मुलाचा मंगळवारी (ता. 10) मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. 9) रात्री छत्तीसगडच्या कोरीया जिल्ह्यात घडली. या मुलाचे नाव रवी सोनवन असून तो खुत्रपारा गावचा रहिवासी आहे.       

हा स्फोटाची तीव्रता इतकी होती की, रूग्णालयात नेताना त्याची आतडी बाहेर आली होती. त्याच्या घरच्यांनी त्याच्याभोवती एक जाड कापड गुंडाळले होते जेणेकरून त्याचे आतडे बाहेर येणार नाही. या घटनेनंतर त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

रवीसोबत त्याचा आणखी एक मित्र त्याच्या सोबत होता, तोही जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील संजिवनीरूग्णालयातील अॅम्ब्युलन्सच्या चालकांचा संप असल्याने रवीला वेळेत रूग्णालयात नेता आले नाही. त्यामुळे त्याला टॅक्सीने नेण्यात आले. 

मंगळवारी सकाळी त्याला अंबिकापूर मेडीकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले, पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून लवकरच बरा होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

  

Web Title: 12 years old boy due to mobile blast