esakal | 125 रुपयांच्या नाण्याचं PM मोदी करणार अनावरण
sakal

बोलून बातमी शोधा

125 रुपयांच्या नाण्याचं PM मोदी करणार अनावरण

125 रुपयांच्या नाण्याचं PM मोदी करणार अनावरण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी 125 रुपयांचं नाणे जारी करणार आहेत. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 125 रुपयांचे विशेष स्मारक नाणे जारी करणार आहेत. यावेळी मोदी एका सभेला संबोधितही करतील. दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष नाण्याचे अनावरण केले जाईल. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

125 रुपयांचं हे विशेष नाणे भारत सरकारच्या कोलकाता टाकसाळद्वारे बनवले आहे. या नाण्याचं वजन 35 ग्रॅन इतकं आहे. या नाण्यामध्ये इतर धातूंमध्ये 50 टक्के चांदीही मिसळली जाईल. महत्वाचं म्हणजे, 125 रुपयांचे हे नाणे कधीही चलनात येणार नाही.

हेही वाचा: गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

स्वामीजींनी 100 हून अधिक मंदिरांची स्थापना केली आणि जगाला भक्ती योगाचा मार्ग दाखवणारे अनेक ग्रंथ लिहिले. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) ची स्थापना केली. ज्याला सामान्यतः "हरे कृष्ण चळवळ" म्हणून ओळखले जाते. श्रीमद्भगवद्गीतासह इतर वैदिक साहित्याचे इस्कॉनने 89 भाषांमध्ये भाषांतर केले आहे. जगभरात वैदिक साहित्याच्या प्रसारामध्ये इस्कॉनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

loading image
go to top