आंध्र प्रदेश : गोदावरी नदीत बुडाली बोट; 13 मृत्युमुखी

आंध्र प्रदेश : गोदावरी नदीत बुडाली बोट; 13 मृत्युमुखी

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात देवीपट्टण येथे गोदावरी नदीमध्ये बोट बुडून झालेल्या भीषण अपघातात 13 जण मृत्युमुखी पडले असून, अन्य तीस जण बेपत्ता आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुरक्षा दलांना अन्य 27 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरवात केली. हा अपघात झाला तेव्हा या बोटीतून 51 जण प्रवास करत होते, यातील 29 हे तेलंगण, बारा जण हैदराबाद आणि सतरा जण वरंगळ; तर अन्य तीस जण विजयवाडा, विशाखापट्टण आणि राजामुंद्री येथील रहिवासी आहेत.

अपघातग्रस्त बोट ही आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीची आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गोदावरी नदीमध्ये पाच लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नदीतील पाणीपातळी वाढली होती. ही बोट देवीपट्टणजवळील गंडी पोचम्मा येथून प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पापिकोंडालूच्या दिशेने चालली असताना ती कच्छुलूरू येथे बुडाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्वच बोटसेवांना ब्रेक लावला आहे.

सध्या मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असून, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. बचावकार्यासाठी स्थानिक पातळीवर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, शोधकार्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com