बेरोजगारीवर आठवलेंनी केले भाष्य, म्हणाले...

वृत्तसंस्था
Sunday, 15 September 2019

जीडीपी वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील

नवी दिल्ली : देशात वाढत्या बेरोजगारीमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, देशात नवीन तंत्रज्ञान येत आहे. या तंत्रज्ञानामुळेच देशात बेरोजगारी वाढली आहे. यापूर्वी एका कंपनीत 1000 लोक काम करत होते. त्यांची संख्या आता 200 वर आली आहे. हे सर्व तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले.

बेरोजगारीवर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, सध्या देशात बेरोजगारीचे वातावरण आहे. मात्र, ही बेरोजगारी नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झाली आहे. यापूर्वी 1000 लोक ज्या कंपनीत काम करत होते, तिथं आता 200 लोक तेच काम करत आहेत. ते फक्त वाढत्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. तसेच आता एक व्यक्तीच दोन मशिन्सवर नियंत्रण ठेऊन त्यामाध्यमातून काम करु शकते. मात्र, यापूर्वी तसं घडत नव्हते. या मशिन्स हाताळण्यासाठी 10 पेक्षा अधिक लोक लागत होते. आता ही परिस्थिती बदलली आहे. 

खिचडी शिजवणारी महिला झाली करोडपती (व्हिडिओ)

तसेच ते पुढे म्हणाले, सध्याचे सरकार बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने काम करत आहे. अशाप्रकारे काम करणाऱ्यांना सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून सहाय्यही केले जात आहे.  

राज्याचा औद्योगिक विकास घसरला - पृथ्वीराज चव्हाण

दरम्यान, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर जीडीपी खालावल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. हे सर्व आरोप आठवले यांनी खोडून काढले.

जीडीपी वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रिजमध्ये असलेल्या मंदीबाबत बोलणे टाळले होते. मात्र, मंदीला ओला-उबेर जबाबदार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत खालावलेली अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि नीति आयोग प्रयत्न करत आहे. जीडीपी वाढविण्यासाठी सरकारचे विशेष लक्ष आहे, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployment growing due to upsurge in new technology says Ramdas Athawale