Indian In Ukraine
Indian In UkraineSakal

युक्रेनमधून किती भारतीय परतले; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

पुढील 24 तासांसाठी 13 विमाने नियोजित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
Published on

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकार ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवत असून, या अंतर्गत आतापर्यंत किती भारतीय मायदेशात परतले आहेत याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची आकडेवारी देण्यात आली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत जवळपास 13 हजार 300 नागरिकांना भारतात सुखरूप आणण्यात आले आहे. पुढील 24 तासांसाठी 13 विमाने नियोजित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

मागील 24 तासांमध्ये आणखी 15 विमानांद्वारे 2 हजार 900 जण आले असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाचे (Ministry of Foreign Affairs) प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. मिशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 63 विमाने भारतात पोहचली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Ukraine Russia Latest News In Marathi)

सुमीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सरकारचा सल्ला

युक्रेनच्या युद्धग्रस्त सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भारत सरकराने या विद्यार्थ्यांना घरांमध्ये सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी व्हिडिओमध्ये रशियाच्या सीमेकडे जात असल्याचे नमुद केले होते. त्यानंतर सरकारने विद्यार्थ्यांना घरांमध्ये सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दूतावासाचे अधिकारी या विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (Indian Student In Ukraine)

Indian In Ukraine
युक्रेनवरील नो फ्लाय झोन म्हणजे रशियाविरोधात युद्ध : पुतिन

सरकारने विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आणि आश्रयस्थानांमध्ये राहण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी सरकारने रशियन आणि युक्रेनियन सरकारांवर तात्काळ युद्धबंदीसाठी अनेक माध्यमांद्वारे जोरदार दबाव आणला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com