Gujrat Bridge Collapses: गुजरात पूल दुर्घनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, प्रशासनाचे चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujrat Bridge Collapses: गुजरात पूल दुर्घनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, प्रशासनाचे चौकशीचे आदेश

Gujrat Bridge Collapses: गुजरात पूल दुर्घनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, प्रशासनाचे चौकशीचे आदेश

गुजरातच्या मोरबी येथे रविवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. माच्छू नदीवरील केबल ब्रिज कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 132 लोकांच्या मृत्यू झाला आहे. बचाव कार्य पथकाकडून आणि अधिकाऱ्यांकडून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेत पूलावरील अनेक लोक नदीत पडले. या दुर्घटनेत अनेक जण नदीत वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सूरू केले. या दुर्घटनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Gujrat: 4 दिवसांपूर्वी दुरूस्त केलेला पूल कोसळून अनेक ठार; भयानक Video Viral

या झुलत्या पुलावर 100 जण एकावेळी ये-जा करू शकतात. पण सदर अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 400 ते 500 जण उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या केबल ब्रिजची दुरुस्ती करण्यात आली होती. सदर पुलाचे तीन दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे हा पूल काही दिवसापूर्वीच खुला करण्यात आला होता. उद्घाटन झाल्यानंतर हा पूल कोसळल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पूल दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या पुलाचे काम सांभाळणाऱ्या कंपनीवरतीही 304, 308, 114 या कलमांतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा: Gujrat Bridge Collapse: गुजरातमध्ये नदीत पूल कोसळल्याने आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाना पीएमएनआरएफ निधीतून दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरतचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.