चालकाचे नियंत्रण सुटल्याने 'युपी'त अपघात; 14 ठार, 24 जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 14 जण मृत्युमुखी पडले असून 24 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

इटाह (उत्तर प्रदेश) : मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 14 जण मृत्युमुखी पडले असून 24 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

एका कुटुंबाने साक्रौली गावातून आग्य्राच्या दिशेने जाण्यासाठी बस भाड्याने घेतली होती. आज (शुक्रवार) पहाटे बस इटाह जिल्ह्यातील सराई निम येथील तुंदला रस्त्याच्या शेजारी जालेसर परिसरात पोहोचल्यानंतर झोपेच्या अधीन झालेल्या चालकामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस एका कालव्यात जाऊन कोसळली. या अपघातात 14 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर 24 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जालेसर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी मोहिम हाती घेण्यात आली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार विवाह उरकून सर्वजण ट्रकने गावी परतत असताना ट्रकला अपघात झाला. तर एएनआयच्या वृत्तानुसार मिनी बसचा अपघात झाला आहे.

Web Title: 14 dead, over two dozen injured as tuck plunges into canal in Etah