आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Thursday, 13 February 2020

स्लिपर कोच बस भदाव गावाजवळ असतानाच बसच्या चालकाचा ताबा सुटला अन् बस वेगाने जाऊन पुढे थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघाताचा प्रचंड मोठा आवाज झाला. अपघात झाल्याचे कळताच गावातील लोकांनी मदतीस धाव घेतली व पोलिसांना बोलावले. बसचा पुढचा भाग संपूर्ण चेपला असून बसची दुरावस्था झाली आहे.

नवी दिल्ली : आग्रा लखनौ एक्स्प्रेसवेवर बुधवारी (ता. १२) रात्री  दिल्लीवरुन बिहारला जाणाऱ्या बसने धडक दिली. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून, ३५ प्रवासी जखमी आहेत. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. जखमींना जवळच्या पीजीआय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्लिपर कोच बस भदाव गावाजवळ असतानाच बसच्या चालकाचा ताबा सुटला अन् बस वेगाने जाऊन पुढे थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघाताचा प्रचंड मोठा आवाज झाला. अपघात झाल्याचे कळताच गावातील लोकांनी मदतीस धाव घेतली व पोलिसांना बोलावले. बसचा पुढचा भाग संपूर्ण चेपला असून बसची दुरावस्था झाली आहे.

अपघात झाल्यानंतर त्वरित रूग्णवाहिका बोलवून जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांचा रूग्णालयात मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. 

भीषण प्रकार म्हणजे, अपघातात मृत पावलेल्यांची ओळख अजूनही पोलिसांना पटवता आली नाही. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आयजी रेंजचे ए. सतीश गणेश पोहोचले आहेत. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 people died in Bus accident on Agra Lucknow express way