Viral Video : बापाला वाचवण्यासाठी लेकीची धडपड! ट्रॉली रिक्षा चालवत पार केलं ३५ किलोमीटरचं अंतर

१४ वर्षीय मुलीने जखमी बापाला रिक्षात बसवून तब्बल ३५ किलोमीटर अंतर पार करत हॉस्पिटल गाठले…
Success Story
Success Storysakal

हे प्रकरण ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील आहे. जिथे 14 वर्षीय मुलीचे वडील जखमी झाले. उपचारासाठी त्याला लवकरात लवकर दवाखान्यात नेणे गरजेचे होते, पण वडिलांना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा खाजगी गाडी बोलावण्याइतके पैसे मुलीकडे नव्हते.

मात्र असे असूनही मुलगी आपल्या वडिलांना या अवस्थेत सोडू शकली नाही. अशा स्थितीत मुलीने हार न मानता वडिलांना ट्रॉली रिक्षात बसवून ३५ किमी अंतरावरील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात (DHH) नेले.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 23 ऑक्टोबरची आहे. या दिवशी भद्रक शहरातील मोहताब चाकजवळ एक मुलगी तिच्या वडिलांना ट्रॉलीवर घरी घेऊन जात असल्याचे काही स्थानिक लोकांनी आणि पत्रकारांनी पाहिले. यानंतर ते तरुणीशी बोलले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रॉलीच्या साहाय्याने आपल्या जखमी वडिलांना गावापासून सुमारे 14 किमी अंतरावर असलेल्या धामनगर रुग्णालयात नेणाऱ्या या 14 वर्षीय मुलीचे नाव सुजाता सेठी आहे. ती नदीगन गावची रहिवासी आहे. या मुलीने आपल्या जखमी वडिलांना प्रथम धामनगरच्या रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी वडिलांना भद्रक डीएचएचमध्ये नेण्यास सांगितले.

Success Story
बालपणी रत्नागिरीच्या अशिक्षित महिलेचा CJI DY चंद्रचूड यांच्यावर प्रभाव! 'असं' कळालं ग्रामीण भारताचं चित्र

वडिलांना ट्रॉली रिक्षातून दवाखान्यात का न्यावे लागले?

सुजाताने हार मानली नाही आणि वडिलांसोबत DHH साठी निघाली. अशा प्रकारे या मुलीने वडिलांसाठी 35 किलोमीटर ट्रॉली चालवली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुजाताचे वडील शंभूनाथ 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या भांडणात जखमी झाले होते.

सुजाताने सांगितले की, भद्रक डीएचएचच्या डॉक्टरांनी तिला घरी परत जा आणि ऑपरेशनसाठी आठवड्याभरानंतर येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने त्यांना सांगितले की, "त्यांच्याकडे खाजगी वाहन भाड्याने घेण्यासाठी पैसे नाहीत किंवा रुग्णवाहिका बोलवण्यासाठी मोबाईल फोनही नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी तिने वडिलांचीच ट्रॉली वापरली."

या प्रकरणी डॉक्टर काय म्हणाले?

घटनेची माहिती मिळताच भद्रकचे आमदार संजीब मल्लिक आणि धामनगरचे माजी आमदार राजेंद्र दास यांनी सुजाताला मदत केली. भद्रकचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी (CDMO) शंतनू पात्रा यांनी सांगितले की, "रुग्णाला 23 ऑक्टोबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला आठवडाभरानंतर ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला. पात्रा म्हणाले, ‘आमच्याकडे रुग्णांना घरी परतण्यासाठी रुग्णवाहिका सेवेची तरतूद नाही. उपचार पूर्ण होईपर्यंत तो रुग्णालयातच राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com