दिल्ली: 15 वर्षीय मुलीवर 7 जणांचा बलात्कार

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

रेहान याचे वर्तन चांगले नसल्याने या युवतीच्या पालकांनी तिने रेहानला भेटू नये, यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र तिने पालकांच्या समजावणीस दाद दिली नाही. किंबहुना, शुक्रवारी त्याचा दूरध्वनी आला तेव्हा संबंधित युवती तिच्या आईबरोबरच होती. मात्र ती आईला सोडून रेहान याला भेटावयास गेल्याचे सूत्रांनी सांगितले

नवी दिल्ली - दिल्लीमधील पहाडगंज भागामधील एका हॉटेलमध्ये एका पंधरा वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना अटक केली आहे. या प्रकरणामधील मुख्य आरोपीने संबंधित युवतीबरोबर गेल्या दीड वर्षापासून "नाते' असल्याचा दावा केला आहे.

पीडित युवतीने याआधी केवळ तिच्या प्रियकरानेच तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली होती. मात्र यानंतर इतर दोघांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला. यानंतर काल (शनिवार) संध्याकाळी तिने नोंदविलेल्या तक्रारीमध्ये पुन्हा बदल करत एकूण सात जणांनी हॉटेलमधील खोलीवर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे; तर इतर चार अद्यापी फरार आहेत.

मुख्य आरोपी रेहान याने पीडित युवतीस गेल्या शुक्रवारी चित्रपट पाहण्यासाठी बोलाविले. मात्र चित्रपट पहावयास न जाता तो तिला हॉटेलवर घेऊन गेला. रेहान याचे मित्र या हॉटेलमध्ये याआधीच उपस्थित होते. यानंतर या युवकांनी या द्रव्यामध्ये दारु मिसळून बलात्कार केल्याचे पीडित युवतीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

रेहान याचे वर्तन चांगले नसल्याने या युवतीच्या पालकांनी तिने रेहानला भेटू नये, यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र तिने पालकांच्या समजावणीस दाद दिली नाही. किंबहुना, शुक्रवारी त्याचा दूरध्वनी आला तेव्हा संबंधित युवती तिच्या आईबरोबरच होती. मात्र ती आईला सोडून रेहान याला भेटावयास गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

रेहान या आरोपीची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. रेहान याच्या गुन्हेगारी वर्तनाची या युवतीस काहीही कल्पना नसल्याचे आढळून आले आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

Web Title: 15 year old gang raped in Delhi