एका १५ वर्षांच्या मुलीवर पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याची घटना समोर आलीय. ओडिशातील पुरी इथं घडलेल्या या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. भुवनेश्वरमधील एम्स रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या प्रभारी आणि उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी याबाबत माहिती दिलीय. ही घटना घडल्याचं ऐकून धक्का बसला. पुरी जिल्ह्यातील बलंगा इथं काही गुंडांनी रस्त्यावर एका १५ वर्षीय मुलीवर पेट्रोल टाकून तिला पेटवल्याची घटना घडलीय.